तुम्ही कधी गणपतीपुळेला गेला आहात का? जर गेला नसाल तर जरूर जा. खुपच सुंदर आहे. बीचतर जस्ट अमेज़िंग… राहायला MTDC  रिज़ॉर्ट उत्तम आहे.. आम्ही बीचव्यू सूपर डेलक्स रूम घेतली होती..  रूमच्या बाल्कनी मधून मस्त समुद्र दिसत होता. आणि रिज़ॉर्ट मधले जेवण पण छान होते. फक्त थोडे महाग वाटते. रिज़ॉर्ट मंदिराच्या एकदूम जवळ आहे. जस्ट ५ मिनिट्स चालले की मंदिर आले. मंदिर ही एकदूम बीचवरच आहे. एक खूपच सुंदर अनुभव आहे गणपतीपुळे म्हणजे. मला तर गोव्याच्या बीचेस पेक्षा हा बीच सुंदर वाटला. फॅमिली पिकनिकसाठी गणपतीपुळे खूप छान ऑप्षन आहे.

 

 

Shivaji maharaj mandir

 गणपतीपुल्याच्या जवळच देरवण म्हणून गाव आहे.  ईथे आपल्याला एक वेगळे मंदिर बघायला मिळते… शिवाजी महाराजांचे.. वालावरकर स्वामी यांनी हे मंदिर बांधले आहे.  ईथेच त्यांची समाधी पण आहे. एक खूपच सुंदर आसा उपक्रम आहे हा. एक छोटासा किल्लाच त्यांनी ईथे उभा केला आहे आणि महाराजांच्या लहानपणापासूनचे प्रसंग त्यांनी ईथे मूर्तिरुपात उभारले आहेत. हे मंदिर व किल्ला बघून माझा उर अभिमानाने भरून आला.

Valvavarkar Swami

 एकदा ईथे जायलाच पाहिजे प्रत्येक मराठी माणसाने..

Advertisements

 दुबईचे इमाम यांना आपल्या मोबाइलवर न्यूड फोटो बाळगल्याप्रकरणी व स्त्रियांशी संबंध ठेवल्यापद्दलडिसेंबरमधे अटक ज़ाली होती; त्यांना एक वर्षाची शिक्षा सुद्धा सुनवली होती. पण नवीन वर्डिक्टनुसार, त्यांना १ महिन्याची शिक्षा ठोठवली आहे. हे ईजिप्षियन इमाम म्हणे अनेक स्त्रीयाना आपल्या ब्लॅकबेरी मेसेंजर वर चॅट करून त्यांना आपल्याशी शारीरिक संबंध ठेवायला सांगायचा. त्यांना अश्लील फोटो पाठवायचा.

 हे मुसलमान / तालिबानी लोक अख्या जगाला आपले तत्व शिकवित असतात; ह्यांच्यासाठी कुराण म्हणजेच सर्वकाही.. पण आता हे तालिबानी काय करणार आहेत?  ही लोक अफगाणिस्तानमधे स्त्रियांना बाजारात एकट्या जातात म्हणून भर बाजारात चाबकाचे फटके देतात. आणि आता ह्या त्यांच्या धर्मगुरू संदर्भात हे काय करणार आहेत? मला माहीत आहे की दुबईमधे आणि अफगाणिस्तानमधे फरक आहे. पण तालिबानी लोकांना फाइनान्स करणार्‍यामधे दुबई नक्कीच असणार.  आपल्या जामा मशिदिचे इमाम आता काय फतवा काढतात ते बघायचे आता.. नाहीतरी त्यांना सवयच आहे प्रत्येक गोष्टीवर फतवा काढायची..

ही न्यूज़ तुम्ही इथे डीटेल मधे वाचू शकता…

     काल न्यूज़ वर बातमी दाखवत होते की अबु आझमीने सुद्धा ट्रेनने प्रवास केला. मला एक काळात नाही की ह्याने त्यांना काय दाखवायचे आहे? पहिले राहुल, मग राज आणि आता अबु.. सगळा मूर्खपणा चालला आहे. त्यांना जर सामान्य माणसाशी खरच काही देणघेन असेल, तर त्याना विनंती आहे की त्यांनी लोकांचे अजुन हाल करू नयेत. या लोकांबरोबर त्यांचे सेक्यूरिटी गार्ड्स चढतात, पहिलेच ट्रेनला एवेडी गर्दी असते आणि वरती हा तमाशा.

        एक माणूस, जवळपास ६० वर्षे वयाचा असेल, तो सुद्धा त्याच ट्रेन मधे होता आणि चॅनेलनि त्याचा इंटरव्यू घेतला. म्हणजे, हा माणूस सगळ्या चॅनेलच्या लोकांना घेऊन गेला होता. काय गरज आहे आसे पब्लिसिटी स्टंट करायची? एक तर गर्दीच्या वेळेला लोकांना पाय ठेवायला जागा नसते. आणि वरती ही लोक आपले ५०-६० लोक घेऊन उगाचच गर्दी वाढवायला ट्रेनमधून येतात.

      हे असे वागून लोकांचे प्रश्न कसे सुटणार? तो वयस्कर माणूस (ज्याचा इंटरव्यू घेतला होता), एवढा चिडला होता, तो जवळपास ४० वर्ष ट्रेनने प्रवास करतोय. म्हणजे त्याने जवळपास १ ते १.५ लाख रुपये रेलवेला दिले आहेत. पण तो बिचारा उभ्याने प्रवास करत होता आणि अबु आपला बसला होता. सगळी लोक एवढी चिडली होती की सगळे त्याच्या विरोधातच बोलत होते.

शेवटी सगळे पोलिटिकल लीडर्स सारखेच….

राज़ ठाकरे यांची ट्रेन ची सफर...

राज़ ठाकरे यांची ट्रेन ची सफर…

काल न्यूज़ मधे एक बातमी दाखवत होते. राज ठाकरे यांनी डोंबिवली ते दादर ट्रेन ने प्रवास केंला म्हणून..

त्यांच्या केस ची सुनावणी होती म्हणून ते डोंबिवलीला आले होते. जाताना ते ट्रेन मधून गेले.

        त्याना बघायला स्टेशन वर खूप गर्दी जमली होती आणि मनसेच्या लोकांनी (राज यांच्या कार्यकर्त्यानी) सामन्या लोकांना, जे रोज त्या ट्रेन मधून प्रवास करतात, त्यांना त्या डब्यात चढूच दिले नाही. राज ठाकरे संपूर्ण प्रावसभर कोणत्याही सामान्य माणसाशी ना संवाद साधता, आपल्या कार्यकर्त्यांच्या  गराड्यात बसून प्रवास केला, दादरला उतरले, आणि आपल्या घरी गेले.

     मला हे समजत नाही की त्यानी हे करून काय मिळवले? त्याना काय प्रूव करायचे होते? फक्ता राहुल गांधीनी ट्रेन म्हधुन प्रवास केला म्हणून यानी केला की काय?

     मलासुध्धा राज ठाकरे यांच्या पद्द्ल आदर आहे. पण म्हणूनच मला त्यानी दुसर्‍या सामान्य नेत्यांसारखे वागावे हे आवडले नाही. ह्याच्यामुळे मला वाटले की खूप दिवस त्यांचे नाव लाइमलाइटमधे नाही म्हणून हा प्रकार तर नाही?  मला राजकडून खूप अपेक्षा आहेत. मला मनापासून असे वाटते की त्या माणसामधे काही करून दाखवायची ताकत आहे; जिद्द आहे. पण म्हणूनच मला त्यांच्याकडून अशा पब्लिसिटी स्टंट ची अपेक्षा नाही. ते जे विचार मांडता आहेत, त्यानी तोच पकडून राहावे, लोक आपोआप त्यांच्या पाठी येतील.

कधी कधी असे वाटते की त्यांचे विचार / वागणे हा सुद्धा एखादा पब्लिसिटी स्टंट नसेल ना? बाकी नेत्यांकडून काही अपेक्षा करणे सुध्दा आता मूर्खपणा वाटतो आता.. राज यांना एकच विनंती. त्यांनी सुद्धा बाकीच्या नेत्यांसारखे वागू नये.. आपला वेगळेपणा जपावा. शेवटी विजय तुमचा आहे.

माझी मते…
हा ब्लॉग मी माझी स्वताची मते मांडायला चालू केला आहे..
या जगात एवद्या गोष्टी घडत आहेत..
या ब्लॉग वर मी मला जे वाटते ते सगळे लिहिणार आहे..
आशा आहे की तुम्हाला आवडेल..
Welcome to my world .. welcome to mazeemate..

Hi,

This is the first time I am writing something.. (other than exam papers 🙂 )..

There is so much actvity/ so much going on in this world. I just thought I should have some way to express my thoughts.. thus I have started this blog..

Lets see how things goes from here…

welcome to my world.. my thoughts..

Aside  —  Posted: February 3, 2011 in Uncategorized